सांगली : कृष्णा नदी काठावरील साखर कारखानदारांनी कारखान्यातील मळी कृष्णा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे कृष्णा नदीपात्रातील हजारो मासे मरून पडले आहेत. मळी मिश्रीत पाण्यामुळे नदीत माशांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे.


गेली दोन महिने पावसाने ओढ दिल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत नेहमी खालविलेली होती. पण गेली 8 ते 10 दिवसात कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. याचा फायदा कृष्णा नदी काठावरील साखर कारखानदारांनी घेत कारखान्यातील मळी ओढ्यांमधून कृष्णा नदीच्या पात्रात मिश्रीत करत आहेत. यामुळे कृष्णा नदीपात्रातील हजारो मासे मरून पडले आहेत.

नदी पात्रातील पाणी रासायनिक झाल्यामुळे मृत मासे मरून काठावर खच पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदी पात्रातील पाणी पिण्यास योग्य नसल्यामुळे नदी काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच प्रश्न गंभीर बनला आहे.

नदी पात्रात मळी मिश्रीत पाणी सोडणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई होणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.  मळी मिश्रीत पाणी सोडून हजारो माशांच्या मृत्यूला जबाबदार धरून कारखानदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी नागरिका करत आहेत.