maharashtra Legislative Council election : विधानपरिषदेत पहिला गुलाल भाजपला उधळला असू योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम राहिली. भाजपकडून पंकजा मुंडे आणि परिणय फुके सुद्धा विजयी झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने एकाचा कोणाचा पराभव होणार? याचीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीने शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांना कमी मते पडल्याने मतदान केंद्रातून निघून गेले. दरम्यान, अजित पवार गटातील शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे आमदार फुटीची चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. 



महायुतीने निवडणुकीत 9 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक 5 उमेदवार उभे केले आहेत. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादी-सपा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा देत आहेत. जयंत पाटील सध्या आमदार आहेत.भाजपचे पाच उमेदवार जिंकण्यासाठी किमान 115 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 103 आमदार आहेत. याशिवाय इतर 9 लहान पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे.