मुंबई : मनोज जरांगेच्या (Manoj Jarange) मुंबईतील (Mumbai) आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. या फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सोलापूरमधील (Solapur) पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, 26 जानेवारीला लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल होत आंदोलन करण्याची धमकी देत कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची भाषा केल्याबद्दल कारवाईची मागणी सुद्धा सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे. सोबतच, या आंदोलनाला परवानगी नाकारण्याची मागणी न्यायालयाकडे सदावर्तेंकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 22 तारखेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


एकीकडे मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या वतीने मुंबई आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, दुसरीकडे या आंदोलनाची परवानगी नाकारण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी सदावर्ते यांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. तसेच, यावर तात्काळ कालच्या कालच सुनावणी घेण्याची मागणी देखील सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाकडून 22 जानेवारीला सुनावणी घेण्याच निश्चित करण्यात आले आहेत. तर, सोलापूरमधील पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा सदावर्ते यांच्याकडून केली गेली आहे. 


मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नयेत...


दरम्यान, यावर बोलतांना सदावर्ते म्हणाले आहे की,"मनोज जरांगे मुंबईत येऊन मुंबई जाम करणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहे. शेअर मार्केट टार्गेट करू असे सांगत आहे. मंत्र्यांच्या घरात घुसू असेही सांकेतिक भाषेत सांगत आहे. आमच्या सारख्या विरोध करणाऱ्या लोकांची फक्त घरच जाळत नसून, मुंबईत येऊन दाखवणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत येऊ देऊ नयेत अशी आमची मागणी आहे. मुंबईला सुरक्षित ठेवावे, मुंबई आर्थिक राजधानी असून याठिकाणी कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसेच जरांगे यांच्यासदाह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,"असे सदावर्ते म्हणाले आहेत. 


माळी समाजाच्या तरुणाची हत्या करण्यात आली...


पुढे बोलतांना सदावर्ते म्हणाले की, "हिंसक आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही. मनोज जरांगे यांची सर्व माहिती आज न्यायालयात देण्यात आली. कशाप्रकारे घरं जाळल्या जातात, गाड्या फोडण्यात येत आहेत याची माहिती देण्यात आली. आंदोलन मोठं असल्याचे दाखवण्यासाठी एका माळी समाजाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ समोर आले असून, न्यायालयात मांडण्यात आले आहेत. तरुणाची हत्या करून आत्महत्या असल्याचे दाखवण्यात आले. पोलीस देखील यात कारवाई करत नव्हते," असे सदावर्ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप