हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी या गावांमध्ये सरपंच पदावरून जोरदार राडा झाला आहे. गावातील ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. यातील दोन्ही पॅनलचे 4-4 सदस्य या ठिकाणी निवडून आले होते. त्यातील सुमन सातकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र सदर महिला ही निवड झाल्यानंतर बेपत्ता होती. ती महिला आज सरपंच पदाच्या निवडीच्या वेळेस हजर झाली. त्यामुळे वाद सुरु झाला आणि या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाली. दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास हे भांडण झाली. त्यामुळे सरपंच निवड झाली नाही.


निवडणुक कुठलीही असो सत्तेसाठी प्रत्येक गट विरोधी सदस्यांना फोडून आपल्यात सामील करून घेऊन सत्ता बळकवतो, याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. हिंगोलीत ही असच काहीसं घडलंय. बिनविरोध आलेल्या महिला सदस्याला आपल्या पॅनलमध्ये घेऊन ऐन सरपंचपदाच्या निवडी वेळी हजर केल्यानं दोन्ही गटात जोरदार राडा झालाय. शिवाय या महिला सदस्याला ही मारहाण झाली आहे.


हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी गावात एकूण 9 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत गावात दोन पॅनल उभे होते. मात्र एका पॅनलने सुमन सातकर या महिलेला बिनविरोध निवडून आणलं. मग 8 सदस्यांसाठी गावात निवडणूक झाली. ज्यात निकालही कमालीचा आला. ज्यात दोन्ही गटाला 4-4 जागा मिळाल्या. जेव्हा हा निकाल लागला तेव्हापासून बिनविरोध निवडून आलेल्या सुमन सातकर या बेपत्ता झाल्या. आज सरपंच पदाची निवडणूक होती, याच वेळी या बेप्पता झालेल्या सुमन सातकर हजर झाल्या. यावेळी ज्या गटाने त्यांना निवडून येण्यास मदत केली. त्यांच्या सदस्यांनी या महिलेला जाब विचारला आणि त्याचवेळी वाद झाला. जोरदार हाणामारी झाली. ज्यात दोन्ही गट अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले. ही बाब पोलिसांना कळल्यानंतर पोलीस तत्काळ गावात पोचले आणि वाद शांत केला. मात्र तोपर्यंत जोरदार हाणामारी या गटात झाली होती. दरम्यान या गावात झालेंल्या वादामुळे अजुनही सरपंच निवड मात्र झालेली नाही.


महत्त्वाच्या बातम्या :