BJP manifesto for Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपला जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केला. गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीरनामा जाहीर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 25 लाख नोकऱ्या, महाराष्ट्राचा संपूर्ण विकास, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना, कर्जमाफी, कौशल्य केंद्र आणि महिलांना 2100 रुपये देण्याचा संकल्प आम्ही केला आहे.






अमित शाह म्हणाले, शिवाजी महराजांनी स्वातंत्र्य चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू केली


अमित शाह म्हणाले, "महाराष्ट्र अनेक युगांपासून प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आला आहे. भक्ती चळवळही महाराष्ट्रातून सुरू झाली. शिवाजी महाराजांनी येथूनच गुलामगिरीतून स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. इथूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. आमचे संकल्प पत्र आहे. महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिबिंब, आज महायुतीने शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची, महिलांचा स्वाभिमान वाढवण्याची आणि वारसा पुनरुज्जीवित करण्याची शपथ घेतली आहे.






महायुती सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा


आज मी आंबेडकरांच्या भूमीवर उभा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या भूमीवर भारतीय राज्यघटनेनुसार शपथ घेतली आहे. कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. याचा देशाला अभिमान आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा, अशी विनंती करतो. वीर सावरकरांचे नाव कोणत्याही काँग्रेस नेत्याने घ्यावे का? बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगान कोणी नेता करू शकतो का? राहुल गांधींनी वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द बोलून दाखवावे. मी म्हणतो की काँग्रेसने आश्वासने दिली तर ती विचारपूर्वक केली पाहिजेत, कारण ते आश्वासने पूर्ण करत नाहीत आणि मला उत्तर द्यावे लागेल. तेलंगणा, हिमाचल ही त्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या आश्वासनांची विश्वासार्हता नरकात गेली आहे. ”


भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या घोषणा



  • वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता 2100 रुपये

  • लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये 

  • 25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य 

  • जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे मार्केट इन्टरव्हेशन करणार 

  • 2024 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न 

  • फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल 

  • विद्या वेतनाच्या माध्यमातून10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार

  • महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार

  • गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार

  • महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार

  • युवात फिटनेस असला पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार 


इतर महत्वाच्या बातम्या