सांगली : सध्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. काही नेत्यांच्या तर एका दिवसाला तीन ते चार सभा होत आहेत. शेवटच्या काही दिवसांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, आपल्या प्रचारसभेत आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणींच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अवास्तव आश्वासनं दिली जात आहेत, असा दावा केला जात आहे. अजितदादांच्या याच दाव्याचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतला आहे. तुझा काकाच ही आश्वासनं पूर्ण करणार आहे, असं ते म्हणालेत. 


इकडे बापाचा विषय नाही, काकाच सगळी आश्वासनं पूर्ण करणार


महाविकास आघाडीचे नाशिक पूर्वचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते यांच्या प्रचारर्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत जयंत पाटील बोलत होते. या सभेत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. "उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते. त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीने एवढ्या घोषणा केल्या आहेत, की त्या यांच्या बापालाही पूर्ण करणं शक्य नाही. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. बापाचा विषय इकडे विषय नाही. ही आश्वासनं तुमचे काकाच पूर्ण करणार आहेत. तुम्ही चिंताच करु नका, असा खरपूस टीका जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांच्या या टीकेनंतर सभेतील प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. 


अजित पवार यांचीही जयंत पाटील यांच्यावर टीका


दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि जयंत पाटील हे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. अजित पवार सांगली दौऱ्यावर होते. येथे महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत त्यांनी जयंत पाटील यांना त्यांचे नाव न घेता थेट लक्ष्य केलं. जयंत पाटील हे जलसंपदामंत्री होते. त्यांच्या मतदारसंघातून नदी जाते. तरीही त्यांना जनतेला पाणी देता आले नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. 


Jayant Patil Video News :






हेही वाचा :


साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!


Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल


Mahim Vidhan Sabha: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण जिंकणार?, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज