पालघर : हरियाणा येथील शेतकऱ्याने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड करुन अनोखा प्रयोग केला आहे. रणवीर सिंग वय (43) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या साठी सिंग यांनी मित्रासोबत भागीदारी केली आहे. सिंग यांनी डहाणू तालुक्यातील ब्राह्मणवाडीतील 7 एकर शेती वर्षाला दोन लाख रुपये भाड़ेतत्वावर घेऊन हा अनोखा प्रयोग केला आहे.


दरम्यान सिंग याना ब्राम्हणवाडी या गावात येऊन 8 महिने झाले असून या काळात त्याने 8000 स्ट्रॉबेरी रोपे ही महाबशेश्वर येथील वाई येथून आणली. अर्धा एकर पेक्षा कमी जागेत याची लागवड केली आहे. यासाठी त्यांचे वर्षाला एकूण दीड लाख रुपये खर्च होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पाच लाख इतके उत्पन्न मिळू शकते. रोपांच्या वाढीसाठी त्यांना जे तापमान हवे आहे ते मिळत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. सध्या ब्राह्मणवाडी येथे 29 टक्के तापमान असून यासाठी 25 ते 28 टक्के तापमान लागते.

कमी जागेत जास्त उतपन्न देणारे स्ट्रॉबेरी हे फळ असून याकरिता ही शेती सर्वांना फायदेशीर ठरू शकते अस रणबीर यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी 12 वर्ष हरीयाणा येथे 10 एकर मध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली होती. पण त्याना तेथे योग्य ते मार्केट न मिळाल्याने हताश न होता त्यानी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील ब्राह्मणवाडी येथे जागा भाडेतत्वावर घेतली. सध्या या फळाची सुरवात असून 20 ते 25 mm इतकी साइज स्ट्रॉबेरीची झाली आहे .

स्ट्रॉबेरी हे उत्पन्न महाराष्ट्रामधील महाबळेश्वर आणि हरियाणामधील ईसार येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न देते. एका एकर मध्ये हजार रोप लागवड करु शकतो. याकरिता पाच लाख रुपये वर्षाला खर्च होतो. जवळपास यावर खर्च काढून 5 ते 6 लाख इतका नफा मिळतो. तसेच लागवड झाल्याच्या दोन महीन्यानंतर हे फळ उत्पन्न द्यायला सुरु करते. वर्षातुन 4 न ते 8 महिने उतपन्न देते.

होलसेल मार्केटमध्ये या फळाला दोन किलो कॅरेटला 400 ते 500 रुपये इतका भाव आहे. या फळाचे वैशिष्ट म्हणजे यात विटामिन (सी) आणि ओमेगा 3 व शुगरफ्री फळ असल्याने याला मागणी जास्त आहे. याचे भारतात मुंबई व दिल्ली येथे सर्वात मोठे मार्केट आहे. तसेच हे फळ भारतातून एक्सपोर्ट देखी केले जाते. त्यामुळे कमी खर्चात कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे फळ असल्याने याची लागवड सर्व शेतकऱ्यांनी करावी अस रणवीर सिंग म्हणाले.