Indapur Well Accident : विहीरीत अडकलेल्या कामगारांचे तब्बल 70 तासांनी (Indapur Well Accident) शोधकार्य संपलं. मात्र विहीरीत अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ रुग्णवाहिकेसमोर बसून आहेत. संबधित विहीर मालकाने मजुरांच्या कुटूंबियांना 5 एकर जमीन द्यावी तसेच 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत जागेवरून न हलण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतला आहे. 


इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर आल्याने चार जण विहिरीत अडकले होते. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. आज मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही विहीर आधी खान होती आणि त्याचीच विहीर बनवण्यात आली होती. याच विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना ढिगारा अंगावर कोसळला. 


प्रत्येकी 5 लाखांची मदत करणार; अजित पवार


या मजुरांच्या बचावकार्यसाठी NDRFचे पथक दाखल झाले होते.विहीर 100 फूट खोल आणि तितकाच व्यास असल्याने वरून माती पडत असल्याने बचाव कार्य अवघड जात होतं. अखेर चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. सदर विहीर मालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत करणार अशी अजित पवारांनी विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच हे बचावकार्य राबवण्यासाठी अनेक व्यावसायिक पुढे आले होते. तब्बल 70 तासांच्या शोध कार्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.


माती विहिरीत पडल्यानं 4 मजूर अडकले


सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण वय आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते. अचानक त्यांच्यावरती हा मलबा आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगार्‍याखाली ही कालपासून अडकले आहेत. ज्यावेळी ही चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली.


संबंधित इतर बातम्या : 


Indapur Well Accident : काम सुरु असताना अचानक माती विहिरीत कोसळली, चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले