मुंबई :  कोरोनाच्या (Coronavirus)  दुसऱ्या लाटेनं अनेक बालकांच्या आयुष्यातून आनंद जणू हिरावूनच घेतला आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. 


कोरोना महामारीच्या काळात अनेक मुले आई वडिलांचे छत्र हरपल्यावे अनाथ झाली होती. या अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहे अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यामध्ये अडचणी  येऊ शकतात.विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. या  सर्व गोष्टीं ल क्षात घेत महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 


विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जात आहे. या अगोदर राज्य सरकारने  कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा मुलांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची मदत केली आहे. या निर्णयामुळे या बालकांना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षितता देता आली असून विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.


Corona मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना कशी मिळणार 50 हजारांची मदत? असा कराल अर्ज



संबंधित बातम्या :