Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार कायम आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेच्या निर्बंधानंतर रशियाने भारताला कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. रशियाने स्वस्त दरात कच्चे तेल विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत इंधन दरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशातच आज इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जारी केले आहेत. 


तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर 


गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 


देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 


मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
दिल्ली 95.41 रुपये  
चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये


>>  महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील इंधन दर काय?


मुंबई - पेट्रोल 109.99 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.16 रुपये प्रति लिटर


पुणे – पेट्रोल 109.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.31 रुपये प्रति लिटर


नाशिक - पेट्रोल 110.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर


नागपूर - पेट्रोल 109.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर


कोल्हापूर - पेट्रोल 110.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर


अहमदनगर – पेट्रोल 109.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.35 रुपये प्रति लिटर


अमरावती - पेट्रोल 111.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.74 रुपये प्रतिलिटर


ठाणे- पेट्रोल 109.41 रुपये तर डिझेल 94.28 रुपये प्रति लिटर