पिंपरी : मराठी शाळांसाठी सवलतीच्या दरात भूखंड घेऊन त्याजागी इंग्रजी शाळा थाटल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. आरक्षित भूखंड लाटणाऱ्या चार शिक्षणसम्राटांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत.
या शिक्षणसंस्थांमध्ये अभिषेक विद्यालय, ईश्वरदास बहेल चॅरिटेबल ट्रस्ट, प्रितम मेडिकल फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटर आणि ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा समावेश आहे. मराठी शाळांना परवानगी असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा सुरु झाल्या, हा प्रश्न उपस्थित होतो.
भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाला चौकशी करुन फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत.