Maharashtra Jalna News : जालन्यातील (Jalna) मंठा अर्बन को. ऑप. बँकेत (Mantha Urban Cooperative Bank) 12 कोटी 18 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) निर्बंध लादण्यात आलेल्या मंठा अर्बन बँकेच्या (Mantha Urban Bank) विशेष लेखा परीक्षण अहवालात 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 या काळात नियमबाह्य पद्धतीनं व्यवहार आणि कर्ज वाटप केल्याचा अहवाल विशेष लेखा परीक्षकांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर बँकेतील 14 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तत्कालिन सीईओ, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसरसह 14 जणांवर मंठा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जालना (Jalna News) जिल्ह्यातील मंठा को-ऑपरेटिव्ह बँकेत 12 कोटी 18 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीक सीईओ, बँक व्यवस्थापक आणि पासिंग ऑफिसरसह 14 जणांवर अपहार करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 या काळात बँकेच्या विशेष लेखा परिक्षण अहवालात नियमबाह्य व्यवहार आणि कर्जवाटप केल्याचा सबंधितांवर ठपका ठेवण्यात आला होता. 



जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगीही देण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तत्कालीन सीईओंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारसीनं लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते. 


प्रकरण नेमकं काय? 


17 नोव्हेंबर 2020 रोजी मंठा बँकेवर RBI नं सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. वारेमाप कर्जवाटप आणि कर्जवसुली थकल्यानं बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली होती. अशा परिस्थितीत बँकेला कोणतंही नवं कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं यावर निर्बंध घालण्यात आले होते. बँकेनं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असं यावेळी RBI नं म्हटलं होतं. त्यानंतर साधारणतः दीड वर्षांनी या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं. 


महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. या बँकेच्या अत्यंत वाईट आर्थिक परिस्थिमुळे लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे. RBI च्या वतीनं याबद्दलचं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 16 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचं कामकाज संपल्यानंतर त्यांचे बँकिंग व्यवहार थांबवण्यात आले होते, असं RBI च्या निवेदनात म्हटलं होतं. मंठा को. ऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील सहकारी बँक आहे. त्यानंतर या बँकेच्या विशेष लेखा परीक्षण अहवालात नियमबाह्य पद्धतीनं व्यवहार आणि कर्ज वाटप केल्याचं उघड झालं. त्यामुळे तत्कालीन सीईओंसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.