मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणीची शक्यता 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मनी लाँड्रींगच्या आरोपांत केली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'कर्तव्य पथा' चे उद्‌घाटन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथा' चे उद्‌घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे.


योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्यापासून दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी योगी आदित्यनाथ बीएचयू मध्ये पाहणी करणार आहेत. येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम आणि भुल्लनपुर पीएसी येथे तयार होणाऱ्या बॅरेकचीही ते पाहणी करणार आहे. त्यानंतर श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत.


काँग्रेसच्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला सुरुवात


कॉंग्रेसच्या 'भारत जोडो' या यात्रेला आज सुरुवात झाली आहे. आज राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सात वाजता पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. यात्रा सुरू करण्यासाठी राहुल गांधींकडे तिरंगा सोपवण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असं 3500 किमी अंतर ही यात्रा असणार आहे. आतापर्यंतची ही देशातील सर्वात मोठी यात्रा असणार असल्याचं म्हटलं जात आहे. देशाला एकत्र करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांसोबत जोडलं जाण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्ममातून होणार आहे.


BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 


BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयनं आपल्या नियमात बदल करण्याची परवानगी मागितली आहे. कोर्टाकडून बीसीसीआयला परवानगी मिळाल्यास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढू शकतो.


दिल्ली दौरा आटोपून नितीशकुमार बिहारमध्ये परतणार 


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज पटनासाठी रवाना होणार आहेत. ते चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. सकाळी साडेअकरा वाजता नितीशकुमार बिहारसाठी रवाना होणार आहेत. आज दिल्लीमध्ये त्यांचा कोणत्याही नेत्याशी भेटण्याचा प्लॅन नाही. बुधवारी नितीशकुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.


 भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत 


आशिया चषकात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.