मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (83) यांना अटक केली होती. स्टॅन स्वामीच्या साथिदारांच्या भाषणानंतरच 1 जानेवारी 2018 मध्ये कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकला होता. 


इतकंच नव्हे, तर त्यांचे माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून स्टॅन स्वामी हे कारागृहातच आहेत. आपल्याला पार्किंसन्सचा त्रास असून आपलं वय हे 83 च्या वर आहे. त्यामुळे आता काही ऐकूही येत नाही, असा दावा करत वैद्यकीय कारणस्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज स्वामी यांनी विशेष एनआयए दाखल केला होता. 


पाकिस्तानमध्ये होणार SCOचा सराव; भारतीय लष्कराच्या सहभागावर प्रश्नचिन्हं 


मात्र गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्याला एनआयएकडून विरोध करण्यात आला होता. या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने गुणवत्ता आणि वैद्यकीय कारणावरून स्वामी यांचा अर्ज नाकारत त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.