दुसरीकडे, मुंबईतल्या विजेचे दर मात्र कमी करण्यात आले आहेत. मुंबईतल्या टाटा, अदानी आणि बेस्टच्या दरांमध्ये किरकोळ घट करण्यात आली आहे. तर महावितरणच्या दरांमध्ये मात्र 3 ते 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विजेचा उत्पादन खर्च वाढूनही विजेच्या दरात फारशी वाढ केली नसल्याचा दावा आज राज्य वीज नियामक मंडळाने केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत विज नियामक मंडळाने मुंबई आणि महाराष्ट्रातले नवे दर निश्चित केले आहेत.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन 2018 -2020 या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर 1 सप्टेंबर 2018 पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हायटेन्शन वीज वितरणातील मोठे औद्योगिक ग्राहकांसाठीचे दर
टाटा पॉवर
जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 12 पैसे
नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 38 पैसे
अदानी इलेक्ट्रिसिटी
जुने दर (प्रती युनिट) - 10 रु. 07 पैसे
नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पैसे
बेस्ट
जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 65 पैसे
नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 06 पैसे
महावितरण
जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 04 पैसे
नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 20 पैसे
उच्च दाब वितरण (वाणिज्यिक वापर)
टाटा पॉवर
जुने दर (प्रती युनिट) - 9 रु.71 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 90 पै.
अदानी
जुने दर (प्रती युनिट) - 10 रु. 76 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 10 रु. 05 पै.
बेस्ट
जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 17 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 56 पै.
महावितरण
जुने दर (प्रती युनिट) - 13 रु. 47 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 13 रु. 80 पै.
लघुदाब वितरण (छोट्या उद्योगांसाठी)
टाटा पॉवर
जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 34 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 19 पै.
अदानी
जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पै.
बेस्ट
जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 43 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 7 रु. 52 पै.
महावितरण
जुने दर (प्रती युनिट) - 7 रु. 83 पै.
नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 25 पै.
इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रती युनिट 6 रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) 70 रुपये प्रती केव्हीए/महिना असा ठरविण्यात असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
गतिशील पद्धतीने प्रकरणांची सुनावणी
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नवीन सदस्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोगासमोर येणाऱ्या प्रकरणांवरील सुनावण्या वेगाने करण्यावर भर दिला आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत 160 प्रकरणांवर आयोगाने निर्णय दिला असून प्रती महिन्याला 13 प्रकरणे निकाली काढली आहेत. तर 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 17 या प्रमाणे 204 प्रकरणे निकाली काढली आहेत.
तर 1 एप्रिल 2018 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 33 या प्रमाणे 165 प्रकरणे निकाली काढली आहेत. पुढील काळात प्रत्येक महिन्याला 40 पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
एका याचिकेवर 120 दिवसात निकाल देणे अपेक्षित असताना या मंडळाच्या सदस्यांनी सातत्याने कामे करून 27 दिवसात प्रकरणे निकाली काढून 18 दर पत्रके मंजूर केली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.