उस्मानाबाद : डिजिटल शाळांचं स्वप्न दाखवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनांचा चक्काचूर झाला आहे. थकित वीज बिल असणाऱ्या राज्यातल्या सुमारे 13 हजार सरकारी शाळांची वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झालं आहे.


शालेय शिक्षण विभागानं तरतूद करुन शाळेचं थकित वीजबिल भरावं अशी भूमिका उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. मात्र शाळांकडे पैसेच नसल्यामुळे 13 हजार शाळांचं वीज कनेक्शन कापण्यात आलं. त्यामुळे संगणकासह इतर कोणत्याच वीज उपकरणांचा वापर होत नाही. त्यामुळे

उस्मानाबाद शहरातली सरकारी कन्या शाळा. शिक्षकांनी फंड जमा करुन 10 संगणक खरेदी केले. स्वतंत्र संगणक कक्ष आहे. ई लर्निंगची स्वतंत्र रुम आहे. पण दीड वर्षापासून शाळा विजेविना अंधारात आहे.

एक लाख 25 हजारांचे बिल थकल्यानं महावितरणने मीटर काढून नेलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक शाळेला सोलर पॅनेल देण्याची घोषणा केली होती. पण ते आश्वासनही हवेत विरलं.

अंधारातल्या शाळेतून कोणताही ऑनलाईन फॉर्म भरला जात नाही. पंखे ,ट्यूब, दिवे बंद आहेत. लाऊड स्पीकर...साउंड बॉक्स सेट कपाटावर ठेवले आहे. बायोमेट्रीक हजेरी एक वर्षापासून बंद आहे. परीक्षा दुसऱ्यांच्या विजेवर चालते. अशाने कशा होणार शाळा डिजिटल?