पुणे: शाळेच्या ग्राऊंडवर खेळताना विद्यार्थ्याचा धाप लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना, पुण्यात घडली. फरहान फारुख हवेवाला असं या दहा वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.


फरहान पुण्यातील कोंढव्याजवळच्या कॅलम हायस्कूलमध्ये शिकत होता. आज सकाळी शाळा सुरु होण्याआधी, फरहान मैदानावर खेळताना धाप लागून पडला, असं मुख्याध्यापकांनी सांगितलं.

त्याला उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले असता, दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास त्याला मृत घोषित करण्यात आलं. सध्या कोंढ़वा पोलीस अधिक तपास करत आहेत.