नाशिक : निवडणुका आणि राजकारण हा खेळ आहे, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे, असे वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. राजकारणसुद्धा काही बाबतीत खेळासारखेच असते. राजकारणात जय, पराजय असतात. कुठे चुकले याचे मंथन झाले पाहिजे असेही थोरात म्हणाले. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवीत आहोत. भाजपला दूर ठेवण्यासाठी नवी मुंबईत आम्ही एकत्र येत आहोत, असेही थोरात यावेळी म्हणाले.


अशोक चव्हाण बरोबरच बोलले, काँग्रेस आहे म्हणूनच सरकार - थोरात 


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचे बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केले आहे. 'राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे', असे वक्तव्य अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा (Congress) मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना अशोक चव्हाण बरोबरचं बोलले, काँग्रेस आहे म्हणूनच सरकार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्यात तीन पक्ष आहेत, त्यात काँग्रेसचे महत्त्व आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस एक नंबर पक्ष ठरला आहे. राज्य सरकारमध्ये सर्वात कमी आमदार आमचे असल्याने आम्ही तिसऱ्या नंबरचे आहोत. सर्वांमुळे राज्य सरकारचे काम चांगले सुरू असल्याचे थोरात म्हणाले.


देशात काँग्रेसच, काँग्रेसशिवाय युपीए (UPA) नाही


देशात काँग्रेसला सोडून युपीए नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) याच युपीएचं नेतृत्व करत, असल्याचेही थोरात यांनी सांगितले. ओबीसी मोठा घटक आहे, त्यांना न्याय दिला पाहिजे, हीच सर्वांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षणात राज्य सरकार कमी पडले नाही. निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती केली असून, सगळ्या निवडणुका एकत्रच घ्याव्यात असाच आमचा आग्रह आहे. पण आयोग थांबणार नसेल तर उमेदवार उभे केले आहेत, त्यांना उघड्यावर थोडीच सोडता येणार त्यामुळे आम्ही प्रचाराला लागलो असल्याचं त्यांनी सांगितलं. बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात इंदिरा गांधीचे नाव टाळण्यात आले, पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधीचे नाव होते. अटलजींचे मन मोठे होते, आता दुर्दैवाने तसे दिसत नसल्याचे म्हणत थोरात यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.


नाना पटोलेंना सल्ला देणार नाही


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक नेते आहेत.  शेवटी राजकारणामध्ये सर्वच व्हरायटी लागते. आम्हला जसे नेतृत्व पाहिजे तसे मिळाले आहे. पटोले हे अनुभवी नेते आहेत, काँगेसच्या मुशीतील आहेत, म्हणूनच खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये आलेत. त्यांना मी सल्ला नाही देणार असे थोरात यावेळी म्हणाले. नाना पटोलेंच्या आक्रमकपणामुळे पक्षात जर कोणी नाराज झाले तरी त्यांच्या लक्षात येईल असंही त्यांनी सांगितलं.


एसटी कामगारांनी आता थांबाव...अन्यथा


एसटी कामगार बांधवांनी समजून घेतले पाहिजे. किती ताणयचे हे त्यांनी ठरवावे, सरकार सामावून घेऊच शकत नाही. कामगारांनी आता थांबावं कामावर जावे, जर आता त्यांनी ऐकले नाही तर कारवाईचा निर्णय घ्यावाचं लागेल असा इशाराही थोरात यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला. जेवढे चांगले द्यायचे तेवढे त्यांनी दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहेत. त्यांना मर्यादित, छोटे करू नये, ते व्यापक होते रयतेचे राजे होते. चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे होते असेही थोरात यांनी सांगितले.


परीक्षा घोटाळ्यातील जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर होणार आहे.  कितीही मोठा अधिकारी असला, तरी सर्वांवर कारवाई होईल असे थोरात यांनी सांगितलं. परिक्षा भरती घोटाळ्यात जे झाले ते चुकीचे झाले आहे. ज्या संस्था परीक्षा घेतात आमचा त्यांच्यावरच आक्षेप आहे. ज्या संस्था विश्वासार्ह आहेत, त्यांच्यावर जबाबदारी द्यावी अस थोरात म्हणाले. मागील सरकारने नियुक्त्या केल्या आहेत. संस्था बदलल्या पाहिजेत, उच्च दर्जाच्या संस्था निवडल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. न्यासा पॅनलवरची संस्था आहे, मंत्री बारकाव्यात जात नाहीत. पॅनल म्हणजे विश्वासार्ह आहे असे वाटते असे ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या :