नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगची आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक आयोगाची पथकं या पाचही राज्यांच्या वारंवार दौऱ्यावर होते. या पथकांनी रिपोर्ट्सही तयार केले आहेत. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन काही मागण्याही केल्या आहेत. खासकरून बंगालमध्ये भाजपने सेंट्रल फोर्सची मागणी केली होती. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी याठिकाणी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे सुरु झाले आहेत. तृणमूल काँग्रेस दावा करत आहे की पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार आहे. तर भाजप तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार करणार असल्याचं बोलत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कडवी झूंज येथे पाहायला मिळणार आहे.


Shiv Sena in WB Election 2021: जय हिंद, जय बांगला! शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा


तमिळनाडू : तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्ष एआयएडीएमके पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळातील विकामकामांची जोरदारी जाहीरात करताना दिसत आहे. तर विरोधी पक्ष डीएमके-काँग्रेस यांची आघाडी आक्रमक दिसत आहे. विरोधी पक्ष सातत्याने एआयडीएमके सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे. यंदाची विधानसभेची पहिली निवडणूक असेल की जी करुणानिधी आणि जे जयललिता यांच्याशिवाय पार पडणार आहे. भाजप एआयएडीएमके याच्यासोबत युती करुन तामिळनाडू निवडणूक लढवणार आहे.


पुद्दुचेरी : पुद्दुचेरी विधानसभेत एकूण 30 जागा आहेत. पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. बहुमत चाचणीत मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं आहेत. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं. मागील काही दिवसांपूर्वी चार आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायण यांनीही राजीनामा दिल्यानं ही संख्या पाचवर पोहोचली होती. तसेच सहयोगी पक्ष डीएमकेच्या आमदारांनीही राजीनामा दिल्यानं नारायणसामी सरकार अल्पमतात आलं होतं.


Puducherry Floor Test : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी


आसाम : आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. सध्या आसाममध्ये सर्बानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ), सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएमएल आणि आंचलिक गण मोर्चा यांच्यासोबत आघाडी करणार आहे.


केरळ : केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.