मुंबई : शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार असल्याचे त्यांनी लिहले आहे.




शिवसेनेने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बंगालचा राजकीय वातवरण तापणार आहे. एकीकडे बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने मैदानावर उतरलेला असताना एआयएमआयएमने यापूर्वीच बंगालमध्ये निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. आता शिवसेनेच्या घोषणेनंतर टीएमसीसाठी नवी अडचण निर्माण झाली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. 2013 च्या बंगाल निवडणुकीत भाजप पूर्वीपेक्षा कमकुवत पक्ष असायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खात्यात 18 जागा आल्या आहेत. भाजपने बंगालमध्ये चांगल बस्थान बसवलं आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या प्रवेशामुळे कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान होणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी यांचा 23 जानेवारीला बंगाल दौरा
पंतप्रधान मोदी 23 जानेवारीला बंगाल दौऱ्यावर येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान कोलकाताला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा कोलकाता दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 23 जानेवारीलाच ममता बॅनर्जी कोलकातामध्ये नऊ किमी लांबीची पदयात्रा करणार आहे.