Five States Assembly Election 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर  असलेली बंदी  देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. रॅली आणि सभांवर बंदी असली तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हिडीओ व्हॅनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या  आदेशानुसार व्हिडीओ व्हॅनला एका जागेवर 30 मिनीटापेक्षा अधिक प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी करत व्हिडीओ व्हॅन संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत रॅली आणि सभांवर बंदी घातली आहे. दरम्यान आयोगाने शनिवारी रिकाम्या जागेवर कोरोना नियमांचे पालन करत 500 जणांच्या उपस्थितीत व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही व्हिडीओ व्हॅनला एका जागेवर 30  मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबता येणार नाही.


पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, राजकीय पक्ष त्यांचा प्रचार करण्यासाठी व्हिडीओ व्हॅनचा उपयोग करू शकतात. जे उमेदवार प्रचारासाठी व्हिडी व्हॅनचा वापर करणार आहे त्यांना तो खर्च निवडणूक आयोगाला दाखवावा लागणार आहे. निवडणूक अधिकार अशा खर्चांवर लक्ष ठेवणार आहे. आयोगाने म्हटले आहे की, ही व्हिडीओ व्हॅन सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत परवानगी दिली आहे. रॅली आणि रोड शो दरम्यान या व्हॅनचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. 


आयोगने दिलेल्या निर्देशानुसार राजकीय पक्षांना गर्दीच्या ठिकाणी व्हिडीओ व्हॅनला प्रचार करण्यास परवानगी दिलेली नाही. कोणतीही व्हॅन मिनीटापेक्षा अधिक वेळ थांबणार नाही. तसेच या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha