पिंपरी-चिंचवड : प्रशासनाकडून अनेकदा सामान्य नागरिक आणि लोकप्रतिधींमध्ये भेदभाव होत असल्याचे आपण पाहातो. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. रविवारी पिंपरी चिंचवडच्या देहूरोड येथे पोलिसांच्या समोर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाहनचालक सीट बेल्ट न लावताच गाडी चालवत असल्याचे आज पाहायला मिळाले.


रविवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील एका पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर शिंदे माघारी निघाले असताना त्यांच्या वाहनाचा चालक सीट बेल्ट न लावता गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच शिंदे यांच्या ताफ्यातील इतर वाहनांचे चालकही सीट बेल्ट न लावताच गाडी चालवत होते.

शिंदे यांच्या ताफ्यातील अन्य चालकांनीदेखील नियमांचे उल्लंघन केले. परंतु एकाही पोलिसाने त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील (जुना मुंबई-पुणे महामार्ग) पुलाचे उद्घाटन करुन शिंदेंचा ताफा सभामंडपाकडे निघाला होता. तेंव्हा शिंदेंच्या चालकासह अन्य चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.