मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. मुंबई हायकोर्टानं शिंदे गटाला दणका दिल्यानंतर आता शिंदे गट सुुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
आज शिंदे गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. 


उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात  असले तरी शिंदे गटासाठी हा मोठा दणका मानला जातो. आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटांची काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपली भूमीका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महत्त्वाची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सूर आवळला. 


शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात  जाण्याची आग्रही भूमिका घेतली. यानंतर शिंदे गटाच्या सर्वोच्च न्यायालयत  जाण्याच्या हालचाली देखील वाढल्या. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे घेणार आहेत. 


अंतिम कॉपी हाताता आल्यानंतर निर्णय घेणार


 हायकोर्टाच्या निकालाची अंतिम कॉपी हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे. अंतिम निर्णयाची कॉपी हातात आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 


शिंदे गटाचा मेळावा होणार पण कुठे होणारा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार


शिंदे गटाचा मेळावा होणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. या निकालाचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. निकालाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे देखील केसरकर यावेळी म्हणाले.


दसऱ्याच्या दिवशी होणारा मेळावा हा शिवसैनिकांचा


दसऱ्याच्या दिवशी होणारा मेळावा हा शिवसैनिकांचा आहे. ज्या ठिकाणी शिवसैनिक जमणार ते शिवतीर्थ आहे.  मेळाव्याला चांगल्या  विचाराची बाळासाहेबांच्या विचारांची गरज आहे.  त्यामुळे हा मेळावा जल्लोष होणार असल्याची माहिती किरण पावसकर यांनी दिली आहे. 


संबंधित बातम्या :