Eknath Shinde Vs Ajit Pawar Faction : बारामती लोकसभेला (Baramati Loksabha) अजित पवार गटाने (Ajit Pawar) शड्डू ठोकल्यानंतर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा बारामतीसाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बारामतीसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा करताना अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटात मीठाचा खडा पडला आहे. बारामतीमध्ये दगाफटका झाल्यास ठाण्यात शिंदेशाही संपवायची का? असा सवाल अजित पवार गटाने केला आहे. शिवतारे यांनी केलेल्या टीकेनंतर आनंद परांजपे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. 


ठाण्याची शिंदेशाही संपवायची का?


या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, आम्ही कोणीच उमेदवारीची घोषणा केलेली नाही. दिल्लीचे वरिष्ठ नेते आणि महायुतीचे नेते दिल्लीला जाऊन जागावाटपावर चर्चा करतील. आम्ही महायुतीमधील समन्वय आणि मर्यादा पाळली आहे. आम्ही कोणत्याही नेत्याचा अपमान होईल असे वक्तव्य करत नाही, जर आमच्या नेत्यांवर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला प्रत्युत्तर द्यावेच लागेल, ठाण्याची शिंदेशाही संपवायची का? असा सवाल आनंद परांजपे यांनी केला. 


अजित पवार गटाच्या आनंद परांजपे यांनी यांनी शिवतारे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, अजितदादांवर अनेक आरोप त्यांनी करतानाच शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करतो. तसेच मुख्यमंत्री यांचे निष्ठावान आहोत, असे ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा आणि निष्ठेची व्याख्या काय आहे हे सांगावं असे आनंद परांजपे म्हणाले. 


संजय जगताप पुरंदरचे सुपुत्र नाहीत का? तुम्ही हरलात म्हणजे पुरंदरचा अपमान?


परांजपे म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून शिवराळ शिवतारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. 2014 मधे कल्याणमध्ये जनतेने विचारलं का श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान आहे? ठाण्यातील जनतेने शिंदेशाही संपवायची का असं म्हणायचं? याबाबतची भूमिका शिवसेनेची भूमिका मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावी. अजितदादांवर 35 वर्ष बारामतीकरांनी प्रेम केलं, अजितदादा हळवे आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती म्हणून अजित दादांनी प्रती आव्हान केले होतं, असेही ते म्हणाले. संजय जगताप पुरंदरचे सुपुत्र नाहीत का? तुम्ही हरलात म्हणजे पुरंदरचा अपमान? अशी विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या