Eknath Shinde :  एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांना आपण राज्यातच राहणार की केंद्रात जाणार याबाबत देखील प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, अरे, तू मला तिकडे का पाठवत आहेस? पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबात देखील एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे. आम्हाला देखील भाजपने अडीच वर्ष पाठिंबा दिला होता असे ते म्हणाले. माझे याबाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी बोलणे झाले आहे. उद्या आम्ही दिल्लीला बैठकीला जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले. 


माझ्यासारखं प्रेम कोणालाही मिळालं नाही


पंतप्राधन नरेंद्र मोदी आमित शाह या दोघांना देखील मी सांगितलं की, तुम्ही जो निर्णय घ्याल, त्या निर्णयासोबत एकनाथ शिंदे कायम असेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्यामुळं सत्तास्थापनेत कोणतीही अडचण येणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले. भाजपचा जे कोणीअलतील त्याला आमचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. या अडीच वर्षाच्या काळात मला जनतेचं भरपूर प्रेम मिळालं आहे. माझ्यासारखं प्रेम कोणालाही मिळालं नाही. लोकांची माझ्याबाबत चांगली भावना आहे.  वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. 


मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर मी कॉमन मॅन म्हणून काम केलं


महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आहेत. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आहे. त्यामुळं आम्हालामोठा विजय मिळाला. हा जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी पहाटेपर्यंत काम करत होते. दोन तीन तास झोप घ्यायचो असे एकनाथ शिंदे म्हणाले. 80 ते 90 सभा मी घेतल्या. मोठ्या प्रमाणात प्रवास मी केला आहे. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला कधीच समजलो नाही. मी कॉमन मॅन म्हणून वागलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे गप्प होते. त्यानंतर ते नेमके काय बोलणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे आभार. त्यांनी राज्याच्या विकासासाठी निधी दिला, पाठबळ दिला असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 


 



महत्वाच्या बातम्या:


'होय, मला पंतप्रधान मोदींचा फोन आला होता; मी नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार''