मुंबई: पत्रकार परिषदेमध्ये जाताना फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्याचं बोलायचं, इतर काही राजकीय वक्तव्य करायचं नाही अशी आमची चर्चा झाली होती, पण सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यामध्ये तोडफोड करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असा मेसेज पसरवला जात आहे, ते चुकीचं आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. अपप्रचाराला आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना मराठा समाजाने बळी पडू नये असंही मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर या सोशल मीडियातून राज्य सरकारवर मोठी टीका होत आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. 


Eknath Shinde On Viral Video : काय म्हणाले एकनाथ शिंदे?


मराठा समाजाला, मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनाही आवाहनवजा विनंती आहे, त्यादिवशी सह्याद्री अतिथीगृहात पहिल्यांदाच अशापद्धतीने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. साधक बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना आम्ही बोलत बोलत येत होतो, ज्या मुद्यावर चर्चा झाली, प्रॅक्टिकल मुद्यांवर चर्चा झाली यावरच बोलूया, राजकीय विषय नको अशी आमची चर्चा सुरू होती.


कुठलंही राजकीय भाष्य, प्रश्नोत्तरे आज नको अशी चर्चा आम्ही करत होतो. परंतु काही लोक सोशल मीडियावर काहीही अर्थ काढून, संभ्रमाचं वातावरण तयार होईल, मराठा समाजाला आरक्षण देताना  या माध्यमातून विघ्नसंतोषी लोक हे करत आहेत


देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळालं होतं. कायद्याने ते टिकलं नाही. 3 हजार 700 नोकऱ्या आम्ही मराठा समाजाला दिल्या होत्या. मराठा आरक्षण देण्याचा भूमिका सरकारची स्पष्ट आहे, यासाठीच त्यादिवशी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.


सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सांगायचं आहे की याला कुणीही बळी पडू नका. सरकार याबाबतीत गंभीर आहे. दिशाभूल करण्याच्या प्रकाराला बळी पडू नये. जे असे प्रयत्न करत आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे राज्यात सुव्यवस्था राखायची आहे त्यामुळे खोडसाळपणा कोणी करू नये. 


ही बातमी वाचा: