Eknath Shinde: राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो किसान योजनेच्या चौथ्या हफ्त्याचं वितरण केल्यानंतर आजपासून लाडका शेतकरी योजना आपण राबवू असे म्हणत E-pik पाहणीऐवजी सातबारावर पिकाची नोंद आहे, त्या सगळ्यांना मदत देण्याचा निर्णय आपण घेत आहोत असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'बुरी नजर वाले तेरा मुंह काला' अशी विरोधकांची अवस्था झाल्याचा टोला लगावला. एक बैठक बोलवा..आमित भाईंना बोलवा..सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी बैठक बोलवा असेही ते म्हणाले.


बीडमध्ये परळीतील कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय कृषी शिवराजसिंह चौहान यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह अनेक भाजपचे नेते उपस्थित होते.


आपले सरकार जॅकेटवाले...


पूर्वी हप्ते घेणारे सरकार होते आता पैशाचे हप्ते देणारे सरकार आहे. आधीचं सरकार रॅकेटवाले सरकार होते. आपले सरकार जॅकेटवाले आहे. असे म्हणत मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजन उत्तर प्रदेशात सुपर हिट झाल्याचे ते म्हणाले.  महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीन, कांदा पिकासाठी केंद्राची मदत असल्याचेही ते म्हणाले.


राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. मराठवा‌ड्यात थोडा कमी पाऊस झालाय पण आणखी पावसाळा संपलेला नाही. मी आषाढी एकादशीला पांडुरंगाला शेतकऱ्यांना भरभरून दे असे एकच मागणे मागितले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. धनंजय तुम्ही जे आज कृषी प्रदर्शन भरवले असे कुठे ही भरवले नसेल..मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 13 हजार कोटी रुपये दिले आहेत..नानाजी कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपये दिले आहेत. जायकवाडी टप्पा दोन साठी सहाशे कोटी रुपये आपण दिले. जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी आहे त्यांना तुमचा आशीर्वाद ध्या..असेही ते म्हणाले.


मुलींना डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी 100 टक्के फीस सरकार देणार


राज्यातील मुलींना डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी सरकार100 टक्के फीस देणार असल्याचं सांगत या योजना थांबवण्यासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडकी लाडकी बहिण योजना ही केवळ बहिणींना आर्थिक साशकती करण करणारी योजना नाही. योजनेमुळे घरातही आमची इज्जत वाढली हे. आता सासू पण विचारे आणि पती पण विचारतो.  असे म्हणत शेतकऱ्यांना राहिलेला पीक विमा मिळणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


हेही वाचा:


शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फळ आणि फुलांच्या लागवडीसाठी अनुदान, जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती