Badlapur School Crime Case ठाणे:  : बदलापुरातील हिंसक (Badlapur Sexual Abuse Case)  आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते, पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा बदलापूर पोलिसांनी केला आहे. या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत. दरम्यान, या तपासात अनेक आंदोलक बाहेरचे होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


तर आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 68 जणांना अटक केली आहे. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी 40 जणांना अटक केलीय. सोबतच अनेक फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग ही पोलिसांच्या हाती लागले असून त्यातून आणखी काही धक्कादायक खुलासे पुढे येण्याची शक्यता आहे. 


आत्तापर्यंत पोलिसांनी केली 68 जणांना अटक


बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरसह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोडही केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलं. सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतत आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, आत्तापर्यंत पोलिसांनी 68 जणांना अटक केली आहे.अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.


 फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती


तर दुसरीकडे बदलापुरातील (Badlapur) नराधमाचं आरोपपत्र घेण्यास वकिलांनी  नकार दिला आहे. कल्याण कोर्टातील वकिलांनी अक्षय शिंदेचे आरोपपत्र घेण्यास नकार दिला आहे. तसेच बदलापूर रेल्वे पोलिसांनी  अटक केलेल्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक झाले आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. अशातच आता पोलिसांच्या हाती काही धक्कादायक माहिती लागली असून या आंदोलनाच्या गर्दीत काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा बदलापूर पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या कारवाईला वेगळं वळण लागले आहे.


बदलापूरमध्ये तणाव कायम


बदलापूर पूर्वेला असणाऱ्या शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केले होते. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात चालढकल झाल्याने बदलापूर शहर आणि रेल्वे स्थानकात मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बदलापूरमध्ये तणाव कायम आहे. शहरातील मोजकी दुकाने उघडली आहेत. तर शाळा या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. याशिवाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.


हे ही वाचा