जळगाव : भुसावळमध्ये भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची आज निवड होत असल्याने रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व्यास पिठावर उपस्थित होते. या अध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. रावसाहेब दानवे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून घडलेल्या प्रकारानंतर ते बैठकीतून निघून गेले.
भुसावळ शहरात नुकत्याच झालेल्या शहराध्यक्ष निवडणुकीत एकनाथ खडसेंचे समर्थक असलेले सरचिटणीस सुनील नेवे यांनी मनमानी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आणि त्यांच्या मर्जीतील दिनेश नेमाडे यांची निवड केली. यामुळे भाजपतच्या कार्यकर्त्यांचा रोष होता. हा रोष व्यक्त करण्यासाठीच त्यांनी हा राडा केल्याची माहिती मिळत आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे यांना काळं फासत आपला निषेध व्यक्त केला.
भुसावळ भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपनं एक बैठक आयोजित केली होती. बैठक सुरू असतानाच भाजपचाच एक गट तिथे आला आणि सुनील नेवे यांनी मनमानी करत पदाधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचा आरोप करत त्यांना मारहाण केली. एवढचं नव्हे तर नेवे यांच्या तोंडाला त्यांनी काळंही फासलं. त्यावेळी व्यासपीठावर रालसाहेब दानवे आणि गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर रावसाहेब दानवे तिथून निघून गेले.
संबंधित बातम्या :
थोरातांच्या दिल्ली भेटीनंतर वडेट्टीवारांचा रुसवा दूर, पदभारही स्वीकारला
बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे