बीड : स्वर्गीय मुंडे साहेबांनी भावाशी म्हणजेच अण्णांशी रक्ताचे नाते तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी मग मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष हिणवले गेले .मात्र न्याय उशिरा का होईना मिळत असतो त्याप्रमाणे आज हे दिवस आलेत .उशिरा होईना सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाले, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा धनंजय मुंडे हे परळीला जात आहेत. आज त्यांचा परळी मध्ये भव्य नागरी सत्कार होणार आहे.

भगवानगडाचा दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे बीडमध्ये मुक्कामी होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परळीमध्ये जात आहेत. परळीकरांनी धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागताचे नियोजन केले आहे. आज सायंकाळी पाच वाजता धनंजय मुंडे यांचे परळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता मोंढा परिसरांमध्ये यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील या असणार आहेत.

Dhananjay Munde | गोपीनाथ मुंडेंनी रक्ताचं नात तोडलं : धनंजय मुंडे | ABP Majha



या नागरी सत्कार सोहळ्याला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, परळीच्या जनतेन निवडून दिले सरकार स्थापन झाले असे त्यांचे म्हणणे होते. आता परळीत येताना काही तरी जबाबदारी घेवून परळीला या त्यामुळे नागरी सत्कार आयोजित केला आहे. परळीची जनता स्वागताला उत्सुक आहे .खरे तर हे श्रेय परळी व बीडच्या जनतेचं आणि पवार साहेबांनी दिलेल्या जबाबदारीचे आहे.

जसे स्वागताची उत्सुकता आहे. या सत्काराची उत्कंठा आहेच तशीच जनतेची माझ्याकडून मोठी अपेक्षा ही आहे. निवडणुकीपूर्वी जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाच वर्षात पूर्ण करायचा आहे .बीडच्या जनतेचं उत्पन्न वाढवणे हे माझ्या पुढील काळातील उद्दिष्ट असेल, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती की धनंजय मुंडे यांना नेतृत्व सारखं खाता मिळालं नाही त्याबद्दल धनंजय मुंडे आणि या आपले मत स्पष्ट केले ते म्हणाले की मी विधान सभेला पडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद पवार साहेबांनी दिले .त्यामुळे सामाजिक न्याय हा विभाग कमी प्रतिष्ठेचा आहे असा गैरसमज चुकीचा आहे .सामान्य दीन दलित, आदिवासी समाजाला मदत हे खाते चांगल्या प्रकारे करू शकते.

संबंधित बातम्या : 

ग्रंथ दिंडीने 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात

नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त