Eknath Khadse on Jitendra Awhad शिर्डी : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत (Shirdi) पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपचे नेते जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका करत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी जितेंद्र आव्हाडांना एक सल्ला दिला आहे. माझ्या वडीलकीच्या नात्याने जितेंद्र आव्हाड यांना सल्ला आहे की, वाद होईल असा कोणताही मुद्दा हातात घेऊ नका, असे खडसे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या शिर्डी (Shirdi) येथील शिबिरात बोलत होते.
हल्ल्यांना प्रत्युतर द्या
कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे म्हणाले की, गावपातळीपर्यंत अध्यक्ष नेमला आहे का हे महत्वाचे आहे. संघटना मजबूत असेल तर पक्षाचे कार्यक्रम करणे सोपे होते. सभासद नोंदणी सक्रिय झाली की सदस्यांची संख्या वाढते. आंदोलन, मोर्चे हे स्वतः हून केले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी सेल्फ स्टार्टर असायला हवे. जे हल्ले आपल्यावर होत आहेत त्याला प्रतिउत्तर द्या. नेत्यांवर आरोप झाला की तूम्ही सुद्धा समोरच्यावर तुटून पडायला हवे. तुमच्या हातात व्हॉट्सअप, फेसबुक आहे त्यातून तुटून पडा.
महंगाई पर चर्चा क्यों नहीं
महागाईवर ते म्हणाले की, सध्या महागाईवर कुणीच बोलतं नाही. चहा पे चर्चा होते तर मग दूध पर चर्चा क्यू नहीं. महंगाई पर चर्चा क्यों नहीं. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करा, आता पक्षासाठी काम करा. तरच संघटन मजबूत होईल आणि तुम्हाला पुढील काळात यश मिळेल.
संघटन मजबूत करा
शरद पवार यांची पुण्याई आपल्यावर आहे. संघटन मजबूत करा. सोशल मीडिया पुढील काळात महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या व्यक्तिवर जर कुणी बोललो तर हजारोच्या संख्येने समोरच्या व्यक्तीवर तुटून पडा. समोरच्या व्यक्तीला नाउमेद करून टाका.
देवेंद्र फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ नाही दिलं तर संन्यास घेऊ. माझं म्हणणं आहे आता घ्या की संन्यास, आता का शांत आहात, असा टोला एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जालन्यामध्ये जी घटना घडली त्यावेळी सगळ्यात आधी तिथं रोहित पवार पोहचले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हणणारे आता दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. आता सरकार आपल्या दारी करता आणि जनता भिकारी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना म्हटल होते की, तुमच्या सारखा अपयशी मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही, तेव्हा लगेच सगळे माझ्या अंगावर आले होते, असेदेखील ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मालेगावात गुन्हा दाखल