नंदुरबार : हिवाळ्याच्या (Winter) दिवसात थंडी वाढत असल्याने अंडी (Egg) खाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे अंड्याची मागणीत वाढ झाली असून अंड्याच्या दरावर परिणाम होत आहे. अलिकडच्या काळात, किरकोळ बाजारात 30 अंड्यांचा कॅरेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता हा दर 200 रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ दरात 5 रुपयांनी मिळणारे अंडे आता 7 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील तापमान 10 अंशाच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळत आहे. तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर (Egg Price Hike) देखील वाढले आहेत. होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या कॅरेटला 200 रुपयांचा भाव आला आहे. 180 रुपये दराने मिळणारे अंड्याचे कॅरेट आता 200 रुपयांवर पोहोचले आहे.
गावरान कोंबडीची अंडी 10 रुपयांना
किरकोळ दरात 5 रुपयांनी मिळणारे अंडे आता 7 रुपयांना मिळणार आहे. गावरान कोंबडीच्या अंड्यांच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 8 रुपये दराने मिळणाऱ्या गावरान कोंबडीची अंडी आता 10 ते 12 रुपयांना मिळणार असल्याने सर्व सामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.
अंड्याच्या पदार्थांचे भाव वाढणार
दरम्यान, गेल्या वर्षी पाच ते सहा रुपयांना नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात पाच रुपयांना मिळत होते, आता ते सात रुपयांना झाले आहेत. कोंबड्यांचे खाह्य महागल्याने देखील अंड्याचे दर वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहणार आहे, असे सांगितले जात आहे. अंड्याच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स आणि टपऱ्यांवर होणार आहे. ऑम्लेट, अंडाभुर्जी, अंडा-करी यांसारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांच्या पदार्थांचे दर वाढवावे लागतील. परिणामी, सामान्य ग्राहकांना या पदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला आवश्यक प्रथिनांसाठी अंडी खाल्ली जातात, त्यामुळे अनेकांना आपल्या आहारात बदल करावा लागणार असल्याचे चित्र आहे. तर सामान्य लोकांसाठी अंड्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अंडी आरोग्यदायी, पण त्यातील पिवळा भाग खावा की खाऊ नये? आहारतज्ज्ञांचं म्हणणं काय?