Health: अनेक जण सकाळचा नाश्ता करताना अंडी खातात, मग ती उकडलेली असो... किंवा ऑमलेट असो.. जे मांसाहारी आहेत, त्यांना अंडी खाणे खूप आवडते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्ही दररोज नियमितपणे 2 अंडी खाल्लीत तर तुमच्या शरीरात असे काही बदल होतील. जे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.. तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
प्रथिनांचा सर्वात महत्वाचा स्त्रोत
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी हा प्रथिनांचा सर्वात महत्वाचा स्त्रोत मानला जातो. जगभरात असंख्य लोक दररोज अंडी खातात. अंडी हा आरोग्यदायी, पौष्टिक आणि झटपट शिजवणारा नाश्ता आहे. जर तुम्ही दररोज 2 अंडी खाल्ले तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
अंडी हे पोषक तत्वांचे भांडार
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी प्रोटीन पॅक आहे, त्यात व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते. एका अंड्यामध्ये 70 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम फॅट आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन, फोलेट आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात, ज्याचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला फायदा होतो.
रोज दोन अंडी खाल्ल्यास काय होईल?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी दररोज दोन अंडी खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात, जाणून घ्या काय फायदे आहेत याचे..
पुरेसे प्रोटीन
दररोज 2 अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात, याचा अर्थ शरीराला 2 अंड्यांमधून 12 ग्रॅम प्रथिने मिळतात. एवढ्या प्रथिनांमुळे तुमची दैनंदिन कामे योग्य प्रकारे करता येतील आणि तुमच्या स्नायूंना आणि शरीरालाही फायदा होईल.
निरोगी हृदय
तज्ज्ञांच्या मते, दररोज दोन अंडी खाल्ल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो. यामुळे तुमचे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहील. 2 अंडी खाल्ल्याने तुमचे हृदय हानीकारक परिणामांपासूनही वाचेल. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवण्यासही अंडी मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे पदार्थ असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मानले जातात. त्यांच्या मदतीने तुमचे डोळे हानिकारक निळ्या किरणांपासून संरक्षित राहू शकता. त्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
मेंदूसाठी फायदेशीर
अंड्यामध्ये एक पोषक तत्व असते, जे मेंदूच्या विकासात आणि कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दररोज दोन अंडी खाल्ल्याने बुद्धी वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
कमी कॅलरीज
अंडी खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील आणि तुम्हाला भूक कमी लागेल. अंड्यातील कॅलरीज वजन वाढू देत नाहीत आणि कमीही करू शकत नाहीत.
हाडे मजबूत ठेवते
दररोज दोन अंडी खाल्ल्याने, तुम्हाला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 मिळेल, जे हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक पोषक मानले जातात. अंडी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण करतात, ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात.
हेही वाचा>>>
Health: आश्चर्यच... उंच लोकांना कर्करोग लवकर होतो? नेमकं सत्य काय? वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडचा रिपोर्ट सांगतो...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )