Gadchiroli News Update : गडचिरोली जिल्ह्यातील टी सिक्स वाघिणीच्या शोध अभियानात नवा ट्विस्ट आलाय. वाघीण जेरबंद करण्यासाठी सुरू असलेल्या क्षेत्रातच वाघांच्या दोन बछड्यांचे मृत अवयव आढळून आले आहेत. त्यामुळे वन विभागाने याबाबत अजून कसून शोध मोहीम राहली आहे. 


नरभक्षक वाघीणीने 10 बळी घेतल्यानंतर वनविभागाने तिला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू केलीय. या वाघिनीला चार  महिन्यांचे 4 बछडे असल्याने 15 दिवसांपूर्वी शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. मात्र, वाघिणीचे हल्ले पुन्हा वाढल्याने वन विभागाचे 100 अधिकारी आणि कर्मचारी या शोध अभियानात सहभागी झाले आहेत. 


पाच महिन्यात दहा बळी 


गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा-चातगाव जंगलातील वाघिणीने गेल्या पाच महिन्यात 10 बळी घेतले आहेत. त्यामुळे वनविभागाने तिला जेरबंद करण्याचे अभियान सुरू केले आहे. या मोहिमेदरम्यान वाघीण जेरबंद करण्यासाठी सुरू असलेल्या क्षेत्रातच दोन बछड्यांचे मृत अवयव आढळल्याने वनपथक देखील संभ्रमात आहे. 


नरभक्षक झालेल्या वाघिणीची शोध मोहीम अभियान सुरू असताना तिला चार महिन्यांचे चार बछडे असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे वाघीण हिंसक होण्याच्या भीतीने  15 दिवसांपूर्वी शोधमोहीम तात्पुरती थांबवली होती.  मात्र वाघिणीचे हल्ले पुन्हा वाढल्याने 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच शोध मोहिमेदरम्यान वन विभगाच्या पथकाला दोन बछड्यांच्या मृत अवयवांचे तुकडे आढळल्याने बछड्यांना अन्य कुठल्या वाघाने अथवा वन्यजीवाने मारले असावे असा संशय व्यक्त होत आहे. 


अवयवांबाबत संभ्रम


दरम्यान, जंगलात सापडलेले अवयव टी सिक्स वाघिणीच्या बछड्यांचे आहेत का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. अवयवांच्या नमुन्यांना पृथक्करणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. टी सिक्स वाघीण आणि जंगलात मिळालेले अवयव यांचे डीएनए नमुने एक असल्याचे सिद्ध होणे गरजेचे आहेत. सध्यातरी सर्व अत्याधुनिक आयुधांसह टी सिक्स वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम अविरत सुरू आहे. 


या टी सिक्स वाघिणीने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात दहा बळी घेत दहशत निर्माण केलीय. या वाघिणीच्या दहशतीमुळे लोक घराबाहेर पडायला देखील घाबरू लागले आहेत. त्यामुळेच वन विभागाने तातडीने ही शोध मोहीत हाती घेतली आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Nasa : अडीच हजार किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीवर पडणार, नासाकडून अलर्ट जारी