Raj Thackeray : राजकारणात पैसे हे माध्यम आहे. पण मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होतं असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. नुसते पैसे वाटून काही होत नाही, तसं असतं तर मतदानाचा टक्का (Voting percentage) कमी झाला नसता असेही ठाकरे म्हणाले. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात, विविध अंगांनी कामं करता येतात. जोपर्यंत तुमच्या सामाजिक कामांना राजकीय धार येत नाही, तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाणार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक मूलभूत गरजांशी राजकारण जोडलेलं आहे. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का मानता? तुम्ही पुढं येणार असाल तर मी सोबत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज्यकर्त्यांचा स्वभाव हा मोकळा-ढाकळा असायला हवा
पुण्यातील पिपंरी चिंचवडमध्ये 18 वे जागतिक मराठी संमेलन (Jagtik Marathi Sammelan) भरवण्यात आले आहे. यामध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सडेसोड उत्तर दिली. राज ठाकरे यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. सध्या सूडाच्या राजकारणापेक्षा बडबडी राजकारण खूप सुरु आहे. त्यामुळं हल्लीची पिढी राजकारणाकडे पाहून काय म्हणत असेल. ही अशी बकबक करायला यायचं असतं का? यातून काय घ्यायचं भावी पिढीने असे राज ठाकरे म्हणाले. विचारांना 100 टक्के स्वातंत्र्य असायला हवे. राज्यकर्त्यांचा स्वभाव हा मोकळा-ढाकळा असायला हवा. सगळं स्वीकारता यायला हवं असेही राज ठाकरे म्हणाले. 1995 नंतर शहरांची वाताहात व्हायला सुरुवात झाली. आज बेसमुरा शहरांची वाढ झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा
जागतिक मराठी संमेलन भरवून काही होणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तरच तरुणांचे प्रश्न मिटतील असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यात कोणकोणत्या नोकऱ्या आहेत. कुठं रोजगार आहेत. खरं तर हे राज्यकर्त्यांचं काम असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सध्या राजकारणाची स्थिती लयाला गेली आहे. जातीजातीत तेढ निर्माण केला जात आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक बोललं जात आहे. हे काय राजकारण नव्हे. कोणीही इतिहासतज्ञ होतंय असेही राज ठाकरे म्हणाले. हल्ली मी कमी बोलतो. पवारसाहेब जे म्हणतात ना, मी कधीतरी उगवतो ते बरोबरच असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मी अनेक व्यंगचित्रकारांचा अभ्यास केला आहे. या सर्वांचे चित्र पाहून कदाचित तो स्ट्रोक आला असेल. बहुदा मी खूप सराव करत होतो. कारण बाळासाहेब म्हणायचे जे दिसेल, समोर येईल त्याचं व्यंगचित्र काढ. मग मी नळ, ग्लास, टॅक्सी असं काही काढायचो असे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: