Nasa : अडीच हजार किलो वजनी नासाचा उपग्रह (Satellite) भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत आकाशातून पडण्याची शक्यता. 38 वर्षांपासून अंतराळात असलेल्या सॅटेलाईटचा बहुतांश भाग पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा येताच जळून जाईल. जे तुकडे खालीपर्यंत येतील त्याने कुणालाही इजा होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती नासाने दिली आहे. एक निवदेन जारी करून नासाने याबाबतची माहिती दिली आहे. 


नासाने दिलेल्या माहितीनुसार,  2,450 किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रवेश करताच जळून जाईल. मात्र, त्याचे काही अवशेष जिवंत राहण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री हा उपग्रह खाली येण्याची शक्यता असून, त्यासाठी 17 तास लागतील. 


नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीच्या पृष्ठभागावर हा उपगृह पडला तरी त्याचे अवशेष फारसे पृथ्वीवर पडमार नाहीत.. कॅलिफोर्निया-आधारित एरोस्पेस कॉर्पोरेशनने त्याचे अवशेष आफ्रिका, आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  


Nasa : 1984 मध्ये उपग्रह अवकाशात पाठवला


ERBS म्हणून ओळखला जाणारा अर्थ रेडिएशन बजेट उपग्रह 1984 मध्ये अवकाशयानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला.  तो दोन वर्षांसाठी कार्यरत होता. 2005 मध्ये निवृत्त होईपर्यंत उपग्रहाने ओझोन आणि इतर वातावरणातील प्रदूषकांचा डेटा गोळा करणे सुरू ठेवले होते. पृथ्वी सूर्यापासून ऊर्जा कशी शोषून घेते आणि विकिरण करते याचा अभ्यास या उपग्रहाने केला.  


अंतराळातील अमेरिकेच्या पहिल्या महिला सॅली राइडने स्पेस शटलच्या रोबोटिक हाताचा वापर करून ते कक्षेत सोडले होते. याच अंतराळ मोहिमेदरम्यान कॅथरीन सुलिव्हन नावाच्या अंतराळवीराने स्पेसवॉक केला होता. अमेरिकन महिलेचा हा पहिला स्पेसवॉक होता. दोन महिला अंतराळवीरांनी अवकाशात एकत्र उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ होती. 


Space.com च्या वृत्तानुसार, नासाचा उपग्रह रविवारी 8 जानेवारी रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकतो. नासाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने अंदाज वर्तवला आहे की रविवारी संध्याकाळी 6:40 च्या सुमारास ERBS पृथ्वीवर परत येईल. यापूर्वीही अनेकवेळा अवकाशातून उपग्रहाचे अवशेष पृथ्वीवर पडले आहेत. परंतु, त्यासासून कोणताही धोका निर्माण झाला नाही. रविवारी पडणाणाऱ्या उपग्रृहामुळे देखली पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे नासाकडून सांगण्यात आले आहे.   


महत्वाच्या बातम्या


Air India Flight Pee Case : एअर इंडियामधील लघवी प्रकरण! आरोपी आणि पीडितेचे व्हॉट्सअॅप चॅट समोर