सांगली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सांगली जिल्ह्यात 8 दिवसाांचा लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण वाढतच आहे. महापालिका क्षेत्रात देखील मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनासमोर ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील बेडसची संख्या तात्काळ वाढवा असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनला दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक काल संध्याकाळी पार पडली.


कोविड केअर सेंटरमध्ये संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन केले गेले आहे. अशा रुग्णांमध्ये कोविडचे कोणतेही लक्षण आढळल्यास त्यांना तात्काळ कोविड हॉस्पिटलमध्ये भर्ती करून आवश्यक उपचार द्यावेत, अशा सुचना जयंत पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारामध्ये कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही. शहरातील अधिग्रहित करण्यात आलेली खासगी रुग्णालये आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही यावेळी पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व इतर प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.


सद्यस्थितीत जिल्ह्यात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून या रुग्णांमध्ये कोणतीही गुंतागुंतीची लक्षणे निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अतिदक्षता विभागांमध्ये बेडस् ची संख्या आवश्यक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात बेडस् ची व्यवस्था सर्व सुविधांसह 200 पर्यंत वाढविण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.


सांगली जिल्ह्यातील नागरी परिसरात लॉकडाऊन केल्यानंतर देखील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रशासना सोबत बैठक घेतली. सांगली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस डॉ. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. ननंदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी आदी उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


सांगलीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केल्या जाणार 20 हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट


जावई आला भेटीला अन् गाव सारं वेठीला!