बुलढाणा :  जिल्ह्यात दररोज एसटीच्या  240 फेऱ्या होत असतात.  त्यामुळे महामंडळाला 40 लाख रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात आता एसटीच्या 100 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून दिवसाकाठी फक्त 20 लाख रूपयापर्यंत महसूल मिळत असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अधिकारी रायलवार यानी दिली. कोरोनाचा मोठा फटका एसटीला बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


बुलढाणा विभागात बऱ्याच एसटी बसेस डिझेल अभावी उभ्या आहेत. डिझेलचा तूटवडा असल्याने या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. डिझेल घेण्यासाठी एसटीकडे आवश्यक पैसे नसल्याने डिझेल मिळत नाही, डिझेल टॅंकर घेण्यासाठी तेल कंपनीकडे डीडी पाठवावा लागतो. त्याशिवाय डिझेल टॅंकर पाठवला जात नसल्याचा अनुभव आहे. पण डिझेल खरेदीसाठी पैसे नसल्याने एसटी उभी असल्याचं दिसत आहे.


Maharashtra - Karnataka Border Row: 'मराठी भाषिक वाघ आहे' असे स्टेट्स ठेवले म्हणून कन्नड पोलिसांची चार मराठी तरुणांना अमानुष मारहाण


अशा परिस्थितीत एसटी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सात आगार असून सातही आगारात डिझेल पंप आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी अगोदरच काही प्रमाणात पैसे भरल्याने तीन चार दिवस पुरेल एवढेच डिझेल उपलब्ध असल्याची माहिती आहे. तसेच एसटीला नवीन टायरची उपलब्धता नाही, स्पेअर पार्ट नाही त्यांमुळे एसटी कुठेही पंचर होत आहेत. त्याचे पार्ट्स सुद्धा मिळत नाही, त्यामुळे एसटी शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र बुलढाण्यात आहे.


राज्यातही तोटा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात सर्वांची लाडकी एसटी. गावच्या वाहतूक विभागाचा कणा असलेला एसटी विभाग सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे अशा कारणांमुळे एसटी कायम चर्चेत राहते. सध्या एसटीनं स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देखील दिला आहे. खर्च आणि उत्पन्न यांचं गणित, यांचा मेळ बसत नसल्याचं एसटीची आर्थिक बाजू कमजोर होत आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी तर अनेक प्रयत्न केले जात आहेत. नवीन योजना राबवल्या जात आहेत. पण, त्याला म्हणावं तसं यश अद्याप तरी मिळाल्याचं दिसून येत नाही. त्यात लॉकडाऊनच्या काळात एसटीच्या समस्या आणखी वाढल्या. सारे व्यवहार ठप्प झाल्यानं एसटीचा तोटा वाढू लागला.


आली लहर केला कहर... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली!