स्मार्ट बुलेटिन | 18 मार्च 2021 | गुरुवार | एबीपी माझा


1. दहावी-बारावीत 35 नव्हे तर 25 टक्के मिळाले तरी उत्तीर्ण करण्याच्या शिफारशीवर विचार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक संघटनेची मागणी


2. सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, हेमंत नगराळे नवे आयुक्त, सरकारमधल्या सूत्रधाराचा शोध घ्या, देवेंद्र फडणवीसांची मागणी


3. देशातल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात, काल दिवसभरात 23 हजार नव्या रुग्णांची नोंद


4. भारत बायोटेक आणि हाफकिन बायोफार्मा मुंबईत कोरोना लसीचं उत्पादन करणार, केंद्रानं लवकर मान्यता द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी


5. 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताला मंजुरी देणारं विधेयक राज्यसभेत मंजूर, 20 आठवड्यापर्यंत गर्भातील व्यंग ओळखणं कठीण असल्याने निर्णय



6. आरबीआयमधल्या पदांसाठी पहिल्यांदाच मराठीतून परीक्षा होणार, राज्य सरकाराच्या पाठपुराव्याला मोठं यश, 841 हजेरी सहाय्यक पदासाठी 9 आणि 10 एप्रिलला परीक्षा


7. जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक आज, रोमांच शिगेला, नगरसेवक ठाणे, नाशिकमधून करणार मतदान!


8. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या खर्चाचे पैसे वसूल होणं अद्याप बाकी, यावर कोणाचा विश्वास बसेल का? हायकोर्टाचा सवाल


9. नागपूरसह राज्यभर गाजलेल्या आर्किटेक्ट निमगडे हत्या प्रकरणचा पाच वर्षानंतर छडा, सुपारी किलर रणजीत सफेलकरानं हत्या घडवून आणल्याचं उघड


10. इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेतला चौथा सामना जिंकण्याचं विराटसेनेसमोर आव्हान, अन्यथा भारताला मालिका गमवावी लागणार -