मुंबई : निवडणूक काळातील 'ड्राय डे' जाचक आणि बेकायदेशीर असल्याचं सांगत त्याविरोधात ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 20, 21 आणि 23 फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही बंदी जाचक आणि बेकायदेशीर असल्याचं हॉटेल संघटनांचं म्हणणं आहे.

21 फेब्रुवारीला 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारीच्या सायंकाळपासून ते 21 फेब्रुवारीला मध्यरात्रीपर्यंत आणि 23 फेब्रुवारीला दिवसभर मद्यविक्रीसाठी बंदी आहे.