मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी 31 डिसेंबरला मोठं सेलिब्रेशन केलं. 'ओल्या' सेलिब्रेशननंतर गाडी चालवणाऱ्या 613 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. 600 हून अधिक मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दुसरीकडे, उपराजधानी नागपुरातही तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आली. नागपूर पोलिसांनी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या 770 जणांवर कारवाई केली.
31 डिसेंबरच्या संध्याकाळ सहा वाजल्यापासून 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत अनेक वाहनं जप्त करण्यात आली. नागपुरात गेल्या वर्षी ही संख्या 527 इतकी होती.
मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका, असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. त्याशिवाय 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'मध्ये सापडणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कायदेही कठोर करण्यात आले आहेत.
ड्रिंक अँड ड्राईव्ह : मुंबईत 613, नागपुरात 770 तळीरामांवर गुन्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2018 01:18 PM (IST)
31 डिसेंबरच्या संध्याकाळ सहा वाजल्यापासून 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत अनेक वाहनं जप्त करण्यात आली.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -