नाशिक:  नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये मरिन ड्राईव्ह आणि गेट वे ऑफ इंडियावर नागरिकांनी जल्लोष केला.

तर नाशिकमध्येही नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्ये सांस्कृतिक वारसा जपत दरवर्षी प्रमाणे यंदाही सहस्त्रदिप प्रज्वलन सोहळा रामकुंडावर पार पडला.



स्वामी मित्र मेळा संस्थेच्या वतीने रात्री 12 वाजता सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला.

सोबतच गोदावरीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी नदीमध्ये हजारो दिवे सोडण्यात आले..



नदी काठच्या या सोहळ्याच्या वेळी ढोल पथकानंही आपली कला सादर केली. एकाच वेळी 9 ढोल पथकांनी एकत्रित ढोल वादन केलं.