नवी मुंबई : नवी मुंबई महापालिके डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं आहे.

प्रत्येक तीन वर्षानंतर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार पालिकेकडे रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. मात्र ३१ मार्चला डी वाय पाटील रुग्णालयाची मुदत संपूनही, त्यांनी रजिस्ट्रेशन करुन घेतलेले नाही. त्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द झालं आहे.

नवी मुंबई महापालिकेने १ एप्रिलला डी वाय पाटील रुग्णालयाला त्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.

डी वाय पाटील रुग्णालयाने रजिस्ट्रेशन घेण्यासाठी केलेल्या अर्जात, महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाची NOC घेणे बंधनकारक होते. ही NOC डी वाय पाटील रुग्णालयाने पालिकेकडे न दिल्याने, त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द झालं.

सध्या रुग्णालयात असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली असून, नविन रुग्ण भरतीला बंदी घालण्यात आली आहे.