Dr. Babasaheb Ambedkar jayanti LIVE : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट

Dr.Babasaheb Ambedkar jayanti 2022 Live updates : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह आहे..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2022 03:45 PM
Ambedkar jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भीम सैनिकांच्या वतीने आज भव्य शोभा यात्रा

 Dr. Babasaheb Ambedkar jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भीम सैनिकांच्या वतीने  आज भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यावेळी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी निळा शर्ट घालून भन्नाट लेझिम खेळण्याचा आनंद घेतला. जामनेर शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या या शोभा यात्रेत भीम सैनिकांनी मोठ्या उत्सहांत जल्लोष केला आहे

 Dr. Babasaheb Ambedkar jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साकारली 20 × 35 फूट अशी भव्य प्रतिमा

 Dr. Babasaheb Ambedkar jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 20 × 35 फूट अशी भव्य प्रतिमा 131 व्या जयंतीनिमित्त 1131 वही आणि पेन यांच्या द्वारे  सोलापूरचे सुप्रसिद्ध स्पर्शरंग कलापरिवाराचे चित्रकार आणि विश्वविक्रमवीर  विपुल मिरजकर आणि त्यांची टीम ही प्रतिमा साकारलेली आहे.

Devendra Fadnavis : डॉ. आंबेडकर जयंतीचे निमित्त साधत 14 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीसांचे 14 ट्विट

Devendra Fadnavis :  डॉ. आंबेडकर जयंतीचे निमित्त साधत 14 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीसांनी 14 ट्विट केले आहे. 14 ट्विट करत बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना केली आहे. 


 





Dr. Babasaheb Ambedkar jayanti : 131 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशभरातून मानवंदना

Dr. Babasaheb Ambedkar jayanti : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आहे. नागपुरातही आंबेडकर जयंती धडाक्यात साजरी करण्यात येत आहे. आज सकाळपासून दीक्षाभूमीवर ही हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी पोहोचत आहेत. नागपुरच्या संविधान चौकावरचा काल रात्रीचा एक व्हिडीओ सध्या वायरल होत असून त्यात हजारो लोकं सविधान चौकाजवळ गोळा होऊन बाबासाहेबांचा जयघोष करत असतानाचे दिसत आहे. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नागपुरात अनेकांनी आतिषाबाजी ही केली होती. तर मोठ्या संख्येने लोकं संविधान चौकात पोहोचले होते.

उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर- शरद पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”, हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवला. सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!



भारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठातील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य- कुलगुरुंच्या बैठकीत सर्वसहमतीने निर्णय

14 एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठातील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांच्या काल झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला. - उदय सामंत

Beed Bhim Jayanti : बीडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात अनुयायांची मोठी गर्दी



Bhim Jayanti 2022 : राज्य सरकारने सण उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने मोठ्या उत्साहात सण साजरे केले जातायत. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त बीडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामूहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. आकाशात  फुगे सोडून महामानवाला अभिवादन देखील करण्यात आले. एकंदरीत बीड मध्ये आज मोठया प्रमाणात लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले होते
















 

 


 











Bhim Jayanti 2022 : इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Bhim Jayanti 2022 : इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले... 
https://marathi.abplive.com/news/mumbai/bhim-jayanti-2022-ajit-pawar-on-indu-mill-siddharth-collage-babasaheb-ambedkar-jayanti-1050305 

Bhim Jayanti 2022 : प्रकाश आंबेडकर यांचं अकोल्यात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं अकोल्यात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. अशोकवाटिकेतील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. वंचित बहुजन आघाडीनं काढलेल्या दुचाकी रॅलीत प्रकाश आंबेडकर सहभागी. सद्यस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांना नख लावण्याचं काम देशात सुरू असल्याची प्रकाश आंबेडकरांची खंत. समाजाला या परिस्थितीत जाती-धर्माच्या पलिकडे जात एकसंघ होण्याचं केलं आवाहन.

CM Uddhav Thackeray In Chaityabhoomi Bhim Jayanti : चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

CM Uddhav Thackeray In Chaityabhoomi Bhim Jayanti :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.  यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.
      
यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही अभिवादन केले.  मुंबई महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रदर्शन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन दालनास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी भेट दिली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाचे निवेदन चारुशीला शिनई यांनी केले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे,अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी पाहिले.

Beed Bhim Jayanti : बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी 

राज्य सरकारने सण उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने मोठ्या उत्साहात सण साजरे केले जातायत. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त बीडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामूहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. आकाशात  फुगे सोडून महामानवाला अभिवादन देखील करण्यात आले. एकंदरीत बीडमध्ये आज मोठया प्रमाणात लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले होते

Yavatmal Bhim Jayanti News : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन यवतमाळच्या संविधान चौकात सकाळपासून गर्दी

Yavatmal Bhim Jayanti News   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यवतमाळच्या संविधान चौकात सकाळपासून गर्दी झाली होती.  जनसमुदायाची अभिवादन करण्यासाठी रांगच रांग लागली होती. त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदनेने अभिवादनाला सुरुवात झाली. सामाजिक संघटना, राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. जय भीमच्या घोषणेने परिसर निनादला होता.


 

 

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त शिवसेनेकडून डोंबिवलीत भीम पहाट 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेतर्फे प्रथमच भीम पहाट या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा जीवनपट विविध गाण्यांतून उलगडण्यात आला.डोंबिवली पूर्वेच्या इंदिरा गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते समाजातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

parbhani bhim jayanti : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त परभणीत महावंदना 

parbhani bhim jayanti : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महावंदनेच आयोजन करण्यात आलं होतं  जिल्हाधिकारी आंचल गोयल,मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते 5 कोटी मेणबत्तीचे प्रज्वलन करण्यात आले.यानंतर बोद्ध भिख्खू संघाकडून महावंदना म्हणण्यात आली ज्याला मोठ्या संख्येने बोद्ध अनुयायांची उपस्थिती होती.या महावंदनेनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले..

Nanded Bhim Jayanti : नांदेड येथे चिमुकल्यांकडून अठरा तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन

Nanded Bhim Jayanti :  नांदेडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती वर्षानिमित्त सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवत महामानव आंबडेकर यांची जयंती साजरी करण्यात येतेय.शहरातील तक्षशिला बौद्ध विहारात हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. याठिकाणी चिमुकल्यांनी अठरा तास अभ्यास करत अनोख्या पद्धतीने बाबासाहेबाना अभिवादन केलंय.या सलग अठरा तास अभ्यास करण्याच्या या उपक्रमात अबालवृद्धांसह युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.  

Badlapur Bhim Jayanti : बदलापुरात बाबासाहेबांना मध्यरात्री अभिवादन करण्यासाठी जमली गर्दी 

Badlapur Bhim Jayanti :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनी बदलापुरात मध्यरात्री भिम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.  रमेश वाडी परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. तसेच या ठिकाणी थँक्स यु बाबासाहेब आंबेडकर असा आशयाचा सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर आंबेडकर जयंती साजरी होता असल्याने भीम अनुयायींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह दिसून येत आहे... कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर प्रवेश बंद होता.. मात्र यंदा निर्बंध मुक्त वातावरणात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात असून मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत... दीक्षाभूमी परिसर पंचरंगी ध्वजानी फुलून गेला असून उन्हाची तीव्रता पाहता दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपा समोर पेंडोल लावण्यात आला आहे... सकाळीच सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात परेड करत बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सलामी देण्यात आली.... नऊ वाजता बुद्ध वंदना होणार असून दहा वाजता नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत दीक्षाभूमी परिसरात येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करणार आहे...

Dr. Babasaheb Ambedkar jayanti LIVE : पंतप्रधान मोदी यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पंतप्रधान मोदी यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन





Dr. Babasaheb Ambedkar jayanti LIVE : सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या.





डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागपुरातील वाडी परिसरात जोरदार आतिषबाजी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागपुरातील वाडी परिसरात जोरदार आतिषबाजी....


मध्यरात्री बारा वाजता लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आतिशबाजी करत जल्लोष सुरू केला...
 
नागपुरात दीक्षाभूमी सह अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम....

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल

CM Uddhav Thackeray LIVE : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल https://marathi.abplive.com/live-tv 



पार्श्वभूमी

Dr.Babasaheb Ambedkar jayanti 2022: डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. आंबेडकर जयंतीचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. भीमराव आंबेडकर यांची जयंती का साजरी केली जाते हे जाणून घ्या



आंबेडकर जयंतीचा इतिहास
14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.


आंबेडकर जयंतीचे महत्त्व
डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.


चैत्यभूमीवर लगबग, महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले होते. 


चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी 
मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.