भंडारा : मध्यप्रदेशातून आलेल्या एका वाघानं गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा-नागपूरमधील नागरिकांचं जीणं मुश्किल केलं होतं. मात्र, या वाघाला एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरनं मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं.


डॉक्टर दिशा शर्मा. विदर्भवासियांच्या आयुष्यावरचं दहशतीचं सावट दूर करणारी मर्दानी. मध्यप्रदेशमधून आलेल्या वाघानं भंडाऱ्यासह आजूबाजूच्या लोकांचं जगणं कठीण केलं होतं. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्यासाठी डॉक्टरांच्या 3 टीम तैनात करण्यात आल्या.

पण झाडाझुडपाच्या गर्दीतून वाघावर निशाणा साधणं वाटतं तितकं सोप्प नाही. मात्र, अर्जुनानं जसा माशाच्या डोळ्याचा भेद केला, तसं डॉ. दीशा शर्मानं वाघाला एका फटक्यात वाघाला बेशुद्ध केलं.

एका झाडावर पशुवैद्यकीय डॉक्टर दीशा यांची टीम तर दुसऱ्या झाडावर एसटीपीएफची टीम दबा धरुन बसली होती.  तर तिसऱ्या झाडावर डॉक्टर बिलाल यांची टीम होती. डॉक्टर दिशा शर्मा वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेत पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपलं शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केलं आहे. त्यामुळे वनविभागानं त्यांना ही खास कामगिरी सोपवली होती.

जेरबंद वाघ गेल्या काही दिवसांपासून शारीरिक व्याधीनं त्रस्त आहे. त्यामुळे तो फक्त 10 किलोच्या आतलीच शिकार करु शकत होता. त्याला जेरबंद केल्यानं उपचार सोपे झाले आणि त्याच्या जगण्यावरचं सावटही दूर झालं.

असं कळते की वाघाला बेशुद्ध करण्यासाठी dart मारला की कमीतकमी 5 मिनिटांनी टीम ने झाडावरून उतरायचे असते. वाघाला बेशुद्ध होण्यास वेळ लागू शकतो, तो पाहिले पळतो आणि त्यात तो 100-150 किंवा जास्त ही मीटरचा पल्ला गाठू शकतो. पण ह्या वाघाजवळ मंडळी आली, त्याच्यावर जाळं टाकलं, पण तो जाळ्यातून निसटून पळाला. त्यामुळे ह्या तीनही टीमची चांगलीच धावाधाव झाली.

पण अखेर हा जेरबंद वाघाला पकडण्यात या टीमला यश आलंच. शेवटी त्याला रेस्क्यू सेंटरला नेण्यात आलं. मात्र, सध्या टिपेश्वरच्या भागातही एक वाघ फिरतो आहे. त्याला जेरबंद करण्याचं आव्हानही वनविभागासमोर आहे.

सिमेंटच्या जंगलानं हिरवाईवर अतिक्रमण केलं. त्यामुळेच आता जंगली प्राणी आणि माणसांचा एकमेकांशी संघर्ष सुरु आहे.

VIDEO :