Maharashta Vidhan Sabha Election : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराजांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असतानाच आता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपला झटका बसणार का? अशी चर्चा रंगली आहे. सांगलीमधील भाजपचे नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या नाराज नेत्यांची काँग्रेसच्या एका नेत्यासोबत बैठक सुद्धा झाल्याची चर्चा आहे. मात्र, माजी आमदार विलासराव जगताप यांनी ही बैठक झाल्याचे नाकारले आहे. मात्र मी भाजपचा राजीनामा दिला असला तरी माझा अजून पक्षाकडून राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपकडून मला ऑफर आल्यास मी भाजपचे काम करण्यासाठी तयार असल्याचं विलासराव जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोल्हापूर, इंदापूरनंतर आता सांगलीमध्ये सुद्धा भाजपला झटका बसणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 


काँग्रेसमधील एका नेत्यासोबत भाजपमधील नाराज नेत्यांची बैठक 


दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील एका नेत्यासोबत भाजपमधील नाराज नेत्यांची बैठक सुद्धा झाल्याची सूत्राची माहिती आहे. काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात असलेल्यांमध्ये  जतचे माजी आमदार विलासराव जगताप, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, कवठेमंहाकाळचे अजितराव घोरपडे यांचे नाव असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांनी मात्र काँग्रस प्रवेशाबाबत आणि नेत्यांसोबत बैठक झाल्याचे वृत्त नाकारले आहे. आजही भाजप पक्षाची ऑफर आली, तर आम्ही भाजप सोबतच राहू असा दावा त्यांनी केला आहे. 


भाजपला सोडचिट्टी देण्यामागे मतदारसंघातील कारणे सर्वाधिक


दुसरीकडे, भाजपला सोडचिट्टी देण्यामागे मतदारसंघातील कारणे सर्वाधिक आहेत. यामध्ये जागावाटपानुसार विद्यमान आमदार आहेत त्याच पक्षाकडे ती जागा राहणार आहे. त्यामुळे इंदापूरमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे हेच अजित पवार गटाकडून उमेदवार असतील यात शंका नाही. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून नाराजी सातत्याने बोलून दाखवली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या