लातूर : लातूरमधील श्रीसंत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षिकेची छेड काढल्याने चिडलेल्या शिक्षिकांनी आणि तिच्या नातेवाईंकांनी संस्थाचालकाला बेदम चोप दिला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेने काही वेळ गोंधळ झाला होता.

 

 

संस्थाचालक शिवाजी परगे शाळेतील शिक्षिकांना अपमानास्पद वागणूक द्यायचा. तसंच शिक्षिकांना अपशब्द वापरायचा, छेड काढायचा. संस्थाचालकाच्या अशा वर्तणुकीमुळे शिक्षिका अनेक दिवसांपासून त्रस्त होत्या.

 

 

अखेर बुधवारी या सगळ्याचा उद्रेक झाला. शिक्षिकेची छेड काढणाऱ्या शिवाजी पगरेला शाळेतच बेदम चोपलं. मात्र कोणीही या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिलेली नाही. परंतु या प्रकारामुळे शाळेत काही काळ गोंधळ उडला होता.