Digital India In Maharashtra : डिजिटल इंडियासाठी (Digital India) सध्या वेगवेगळे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून (Maha govt) केले जात आहेत. आधुनिक युगात इंटरनेट (Internet) हे एक महत्वाचं साधन मानलं जात आहे. डिजिटल इंडियाच्या केंद्राच्या प्रयत्नाला आता राज्य सरकारकडून देखील हातभार लावला जात आहे आता गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरिता राज्यातील 2386 गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी 200 चौ.मी. जागा मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  






मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनातर्फे सर्व गावांमध्ये 4 जी सेवा उपलब्ध करण्यासाठी 9 डिसेंबर 2023 चे उद्दीष्ट असून त्याअनुषंगाने बीएसएनएलने प्रस्ताव दिल्यावरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. 


यामध्ये निवडक गावांमध्ये 200 चौ.मी खुली जागा अथवा गायरान जमिन विनामुल्य देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावाला मनोरा उभारणीस १५ दिवसात मंजूरी देणे आवश्यक आहे. याठिकाणी महावितरण कंपनीने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा व जोडणी देणे आवश्यक आहे. केबल टाकण्यासाठी या ठिकाणच्या रस्त्याचा वापर विनामुल्य करण्यास मान्यता देण्यात येत असून या ऑप्टीकल फायबर केबल साठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कुठलेही भाडे आकारण्यात येणार नाही.






Maharashtra Cabinet Decision : अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे नऊ निर्णय