Dhule Rain News : गेल्या काही दिवसांपासून धुळे (Dhule) जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जल प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे संततधार पावसामुळं कपाशी (cotton), मका (Maize) यासह खरीप हंगामातील पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या आहे. 


धुळे जिल्ह्यात 10 ते 15  दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु


धुळे जिल्ह्यात मागील 10 ते 15  दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पंधरा दिवसापासून सुर्यदर्शन झालेले नसल्यामुळं याचा पिकांना मोठा फटका बसत आहे. रोजच्या रिमझीम पावसाने मका, भूईमुग, मूग, तूर पिवळे पडत आहेत. कपाशी पिकावर मर रोग पडत आहे. रोजच्या संततधार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यावर्षी मृग नक्षत्रात सुरुवातीस पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणीला सुरुवात झाली आहे. एकही मोठा पाऊस झाला नसला, तरी अधुन मधुन पडणान्या रिमझीम पावसाने पिके जोमात वाढली आहे. यावर्षी मोठा पाऊस नसला तरी पिके जोमात असल्यामुळे शेतकरी खुश होते. रोज संततधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे जोमात आलेली खरीप पिके पिवळी पडत आहेत. मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी केली पण पावसाची उघडीप नसल्याने फवारणीचा परिणाम झाला नाही. यामुळे खरीपातील मका, भूग,भुईमूग , तूर, ही पिके पिवळी पडत आहेत. रोजच्या पावसामुळे त्यांची मुळे कुजत आहेत. तसेच ढगाळ वातावरण असल्याने किडीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढला आहे.


कपाशीचं पिक जोमात, मात्र, पावसामुळं पिक पडले पिवळे


गतवर्षी मुबलक पाऊस झाला नसल्याने कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. मात्र, यंदा योग्य नियोजन व पोषक वातावरणामुळे कपाशी जोमात आहे. मात्र रोजच्या संततधार पावसामुळे कपाशी पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढत्या पावसामुळं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जोन जिल्ह्यांमा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरु