धुळे : केंद्रीय निवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवत अनोखा उपक्रम राबवला आहे. व्यवसायासाठी परदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी रॉ मटेरियलपासून आकर्षक पणत्या बनवून परदेशातील नागरिकांना पाठवण्याचा अनोखा उपक्रम धुळ्यातील केंद्रीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविला आहे.


संपूर्ण भारतात पारंपारिक शिक्षण केवळ नोकरी मिळण्यासाठी घेतले जाते, मात्र ही शिक्षण घेण्याची पध्दती बदलण्यासाठी पुढील भविष्याच्या वेध घेऊन शिक्षणाच्या व विकासाच्या प्रचंड दूर असलेल्या अनुसूचित जाती व समाजातील अत्यंत गरीब शिक्षणापासून वंचित असलेल्या अनाथ मुलांनी आपल्याच शिक्षकांकडून उसनवारीने पैसे घेत त्याच पैशातून परदेशातील भारतीय नागरिकांसाठी सुंदर व आकर्षक असे दिवे तयार करून त्यांची दिवाळी प्रकाशमय करीत त्यांच्याकडून मिळालेल्या या पैशातून पुढील भविष्यासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी त्याचा ते उपयोग करीत आहे.


शालेय शिक्षणासोबतच उद्योजक घडवण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचालित केंद्रीय आश्रमशाळा गेल्या सहा वर्षांपासून प्रत्यक्ष कार्य सुरु केले. व यातून आत्तापर्यंत 61 टक्के विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केलेले आहे. या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे शाळेस “ISO" नामांकन प्राप्त झाले आहे.


या उद्योनमुख शिक्षणात या केंद्रीय आश्रम शाळेतील इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वतः दीपावली साठी भारतीय सण व मांगल्याचे प्रतिक म्हणून आकर्षक असे दिवे बनवून ते थेट लंडन, अमेरिका, आस्ट्रेलिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवून भविष्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत त्याची बीजे रोवित आहेत असे म्हणायला हरकत नाही. 


महत्वाच्या बातम्या :